Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकराज्य विद्या फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमीत पुरस्कार वितरण

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील लोकराज्य विद्या फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापदिनानिमित्त राज्य स्तरीय अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; आमदार देसाई यांचे आवाहन

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील लोकराज्य विद्या फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापदिनानिमित्त राज्य स्तरीय अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्काराचे वितरण खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षेखाल होणार असल्याची माहिती लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक, युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील सांगली रोड लगत असणार्‍या सार्वजनिक स्मशानभूमीत सोमवार, दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे. के. जाधव यांना व सांगली येथील वेध डायग्नोस्टीक अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या प्रमुख कविभूषण डॉ. जयश्री पाटील यांना अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षक नेते माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहूल महाडिक, हुतात्मा दुध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, माजी नगरसेवक वैभव पवार, माजी नगरसेवक अमित ओसवाल, भाजपा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, विद्यामंदिर हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील-ढोबळे, इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके, रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत प्रमूख उपस्थित राहणार आहेत.
सन्मानचिन्ह, मानपत्र, काठी- घोंगडे, वृक्षरोप, अण्णासाहेब डांगे लिखित पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चरित्र ग्रंथ देवून जे. के जाधव आणि डॉ. जयश्री पाटील यांना गौरविण्यात येणार असून पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे संयोजन लोकराज्य परिवाराच्या अध्यक्षा सुवर्णा कोळेकर, उपाध्यक्ष मानसिंग ठोंबरे, आशा तांदळे, बाजीराव हिरवे, वैभव वाघमोडे, रुपाली कोळेकर, रणजीत बनसोडे, पृथ्वीराज तांदळे, महेश चौगुले, ऋतुराज तांदळे, निरंजन पाटील, पोपट कोळेकर, विपुल इरकर, विवेक जगताप, बंटी कोळेकर, बजरंग कदम, डॉ. जयवंत खरात, प्रा. डॉ. राम घुले, राहुल जगताप, विकास वाघमोडे, सुधीर बंडगर, शातीसागर कांबळे, अमर माळी, आकाश कुचीवाले, वैभव खोत, शार्दुल तांदळे, विवेक तांदळे आदीसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.

COMMENTS