अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दुसर्या श्रावणी सोमवारनिमित्त सकाळी 7 वाजता ओम नमो:शिवाय जपाचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले, त्यानंतर स
अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दुसर्या श्रावणी सोमवारनिमित्त सकाळी 7 वाजता ओम नमो:शिवाय जपाचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले, त्यानंतर साबुदाणा खिचडी, व केळी या महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. अत्यंत प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. कोतुळ व परिसरातील अनेक भाविक महाप्रसादासाठी आर्थिक अथवा वस्तूच्या स्वरूपात दान धर्म करत आहे.
पीर साई मित्र मंडळाने 51 किलो साबुदाणा, 30 किलो बटाटा, 20 किलो शेंगदाणा, श्रीराम स्वीटकडून 51 किलो साबुदाणा, 20 किलो शेंगदाणा, सेलटॅक्स ऑफिसर, संतोष (शिवा) अशोक शेळके व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रितीताई शिंदे 30 किलो साबुदाणा 10 किलो शेंगदाणा, चंद्रकांत घाटकर 15 किलो साबुदाणा, अशा प्रकारे महाप्रसाद (खिचडीसाठी)अनेक अन्नदात्यांनी उपक्रमास सहाय्य केले. कोतुळेश्वर हे कोतुळ परिसरातील जागृत दैवत असून, पांडव प्रताप, या धार्मिक ग्रंथात या पवित्र ठिकाणाचा उल्लेख असल्याचे जुने जाणते वृद्ध सांगत आले आहेत. पूर्वीच्या काळी कुंतलेश्वर या नावाने प्रचलित असलेले हेच आजचे कोतुळेश्वर देवस्थान असल्याचे जुने जाणते सांगतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सकाळी 7 ते 9 ओम नमो:शिवाय हा जप, नंतर खिचडी व केळी हा महाप्रसाद भाविकांना दिला जातो. मोठया संख्येने भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पहावयास मिळते. अनेक भाविकांनी या उपक्रमात अत्यंत श्रद्धापूर्वक भावनेने सर्व उपक्रमात सामील होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक नितीन महाराज गोडसे, यांची विद्यार्थ्यांची मोठी फौज या ठिकाणी सदैव कार्यरत होती, भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यास मदत करणे, देवालयाचा परिसर स्वच्छ करणे, महाप्रसादाचे वाटप करणे,ही कामे बाल वारकरी नियमितपणे करताना दिसतात, मंदिर सजावट सहकार्य आरती गीते, व यासाठी लागणारी फुले दादाभाऊ देशमाने यांचेकडून दिली जातात, टाळ, मृदुगाच्या, गजरात बाल वारकरी, व भाविक यांनी हा परिसर गजबजून गेला होता. या वेळी भाविकांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली, योगेश देशमुख, बाबासाहेब देशमुख, बंटी देशमाने, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते, बबलू देशमुख, रवी आरोटे, अशोक शेळके,व सर्वच क्षेत्रातील भाविक या वेळी उपस्थित होते. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या या श्रावण महिन्यात येणार्या पाच ही सोमवारच्या या धार्मिक उपक्रमात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन कोतुळेश्वर देवस्थान समिती व कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक नितीन महाराज गोडसे यांनी केले आहे.
COMMENTS