कोपरगाव प्रतिनिधी ः येसगाव येथे माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास संजीवनी

कोपरगाव प्रतिनिधी ः येसगाव येथे माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे या उपस्थित होत्या तर येथील दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पंडित भारुड व राजेंद्र पाटणकर यांनी उपस्थितां समवेत संवाद साधताना स्व.कोल्हे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.येसगावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री असा दैदिप्यमान प्रवास साहेबांचा होता.येसगावला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणारे आदर्श गाव ही स्व.कोल्हे साहेब यांची कामाची पद्धत दाखवणारी अविस्मरणीय नोंद आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे, सौ हेमलता गुंजाळ, सचिन कोल्हे, सुधाकर कुलकर्णी, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, साहेबराव रोहम, किरण गायकवाड, अतुल सुराळकर, उत्तम पाईक, बाळासाहेब निकोले, गोरख आहेर, शिवाजीराव कोकाटे, सचिन गायकवाड, उमेश कोकाटे, गुलाब भाई तांबोळी, शंकरराव पाईक, बापूसाहेब सुराळकर, कपिल सुराळकर, अयोध्या झावरे, बंडू आदमाने, रवींद्र सुराळकर, प्रदीप कोल्हे, संतोष दाणी आदिंसह विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते
COMMENTS