बीड : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त समाजात बंधुभाव, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देत राजयोग फाउंडेशन आणि पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्र

बीड : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त समाजात बंधुभाव, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देत राजयोग फाउंडेशन आणि पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या गरजवंत पत्रकार बांधवांना ‘ईद मुबारक किट’ चे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून समाजात एकात्मता आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
बीड येथील समर्थ राजयोग च्या मुख्य कार्यालयामध्ये राजयोग फाउंडेशन आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी दुपारी दोन वाजता ईद मुबारक कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धूत, पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी,नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्धिकी, डॉ.वैभव कोठेकर, राजदिप धुत, सागर वाहुळ, मेघराज जगदाळे, सुशांत राऊत, संकेत करवा, वैभव घुमरे, सय्यद ताहेर, राहुल बादाडे, अभिजीत आव्हाड, ओंकार बोबडे राजयोग फाऊंडेशनचे इतर सदस्य यांच्यासह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, नयना भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष रईस खान, शेख आयुब, संपादक समीर काजी, लोकमतचे शेख वाजेद, रफिक पठाण, शेख तालेब यासह मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ मानले जातात. अनेक वेळा ते कठीण परिस्थितीत काम करत असतात. अशा पत्रकार बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि त्यांच्या सणाला आनंदाची उधळण करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजक राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक शुभम दिलीप धूत यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी ईदच्या सणाचे महत्त्व सांगत समाजात शांतता, सद्भावना आणि बंधुत्व टिकवण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी आयोजकांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. ईदच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश देणारा आदर्श उपक्रम म्हणून याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

COMMENTS