Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

आदिवासी सेवा मंडळ मुलूंडचा उपक्रम

अकोले ः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर

ओबीसी आरक्षणात सरकार आणणारेच झारीतील शुक्राचार्य ; माजी मंत्री बावनकुळे यांची शरद पवारांचे नाव न घेता टीका
इंधनाच्या करात कपात व्हावी
शिवराज्याभिषेकासाठी मुस्लिम तरुणाने आणले गंगाजल

अकोले ः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ गोडे यांनी केले. आदिवासी सेवा मंडळ मुलूंड प. यांच्या वतीने अकोले तालुक्यातील केळी कोतूळ परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. त्यामुळे आदिवासी भागातील मुलांना शिक्षण घेणे सुलभ होईल असे म्हणाले. अकोले तालुक्यातील केळी कोतूळ परिसरातील सहा शाळांतील 183 विद्यार्थ्यांना आदिवासी सेवा मंडळ मुलूंड प. मुंबई 80 यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी किशोर वायळ, शरद बांडे, सखाराम शेळके, प्रकाश भांगरे, लक्ष्मण साबळे, जयंत भांगरे, चंद्रकांत भांगरे, लक्ष्मण बेंडकोळी, भिमाजी भांगरे, मारुती साबळे, सुरेश गभाले, गणेश भांगरे, संजय धिंदळे, सुहास भांगरे, मनीषा भांगरे, पुनम भांगरे, युवराज वायळ, लालू वायळ, आदिनाथ गडगे, राजेंद्र देवकर, दिलीप गंभीरे, देवराम वायळ, भाऊसाहेब शेळके, राहूल गोडे, दिपक लोंढे, किरण सोनवणे, दत्ता वायळ, मनिषा रांधवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरु असून मंडळाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे हे पाचवे वर्ष असून त्या अंतर्गत केळी कोतूळ या ठिकाणी साहित्याचे वाटप करण्याच आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मंडळ प्रयत्न करत असून मंडळातील सर्व सदस्य यात सक्रिय सहभाग घेत असल्याची माहिती  यावेळी कावेरी भांगरे यांनी दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडेवाडीची इयत्ता चौथीची विद्यार्थीनी वैष्णवी रावसाहेब गोडे हिने शिवरायांचा पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली. बांगरवाडी, गोडेवाडी, उंबरविहिरे, जांभळेवाडी, गारवाडी, जाधववाडी याशाळांना दिलेल्या साहित्यामधे बॅग, वह्या, अंकलिपी, पॅड, पाटी, पेन्सिल, रंगसाहित्य यांचा समावेश होता तर शाळेला यावेळी खेळाच्या साहित्याचे किटही देण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम धांडे, आदिवासी सेवा मंडळ मुलूंड प. चे अध्यक्ष बाळाराम धिंदळे, केळी ओतूरच्या सरपंच मिना वायळ, केळी कोतूळचे सरपंच चंद्रकांत भवारी, उपसरपंच सुनंदा वाळेकर, अरूण जाधव, भिमाजी मांडवे, महादू वायळ, अनुजा साबळे, राजेंद्र उकिरडे, लालू वायळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल भांगरे यांनी केले तर आभार दिलीप चौधरी यांनी मानले. 

COMMENTS