Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये बालिका दिनानिमित्त कपड्यांचे वाटप

कोपरगाव/ता.प्रतिनिधी ः कोपरगाव बेट भागातील नगरपालिका शाळा नं.5  येथे बालिका दिन चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका. सुवर्णा मठपती

वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये
पंतप्रधान मोदींची 7 मे रोजी अहमदनगरमध्ये सभा
कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने संपवीली जीवनयात्रा

कोपरगाव/ता.प्रतिनिधी ः कोपरगाव बेट भागातील नगरपालिका शाळा नं.5  येथे बालिका दिन चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका. सुवर्णा मठपती-महानुभाव यांचे अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषनातुन सावित्रीबाई चे जीवन व शिक्षणाचे महत्व सांगितले. यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका लीलावती जमधडे, प्रशांत शिंदे, नसरीन इनामदार -पठाण, सुनील रहाणे या शिक्षकांनी आपल्या मनोगतातून महिलांचे शिक्षण व आधुनिक विकासात योगदान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुवर्णा महानुभाव यांनी मुलांना मुलगा -मुलगी मतभेद न करता समान वागणूक, मुलींचे शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाईंचे मुलींसाठी योगदान विषद केले. बालिका दिनाचे औचित्य साधून शालेय सर्वं मुलीकरिता मुख्याध्यापक  विलास माळी, सुनील रहाणे, नसरीन इनामदार-पठाण, अमोल कडू यांनी कपडे दिले. यावेळी मुलींच्या चेहर्‍यावर आनंद गगनात मावत नव्हता. यामुळे मुलींची शाळेतून गळती कमी होण्यास मदत होईल. या कार्यक्रमावेळी नगरपालिका शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक  अमित पराई, समन्वयक  प्रशांत शिंदे,सुनीता शिंदे, अलका मतकर, ज्योती मोरे, रत्ना ढाकणे, साक्षी मतकर, रजनी काळे, व पालक, शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक विलास माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS