Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

संगमनेर/प्रतिनिधी ः यश प्राप्त करायचे असेल व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य

अर्बन बँकेच्या सोनेतारणात घोळ… ३० पिशव्यांमध्ये सापडले बेन्टेक्सचे दागिनेl पहा LokNews24
बोठेने मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला 5 लाखांचा लाभ ; रुणाल जरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
खा. शरद पवारांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत

संगमनेर/प्रतिनिधी ः यश प्राप्त करायचे असेल व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट 313 च्या व्हाईस प्रेसिडेंट रचना मालपाणी यांनी केले.


संगमनेर नगरपालिका आस्थापनातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून इनरव्हील क्लब तर्फे 539 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग तर व्यासपीठावर सेक्रेटरी ज्योती पलोड, संपादक वैशाली खैरनार, उपाध्यक्षा डॉ.श्रद्धा वाणी उपस्थित होत्या. इनरव्हील क्लब संगमनेर यांची वतीने संगमनेर नगरपालिका आस्थापनातील सर्व शाळांना लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक भाषणात नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांनी इनरव्हील क्लबच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करतानाच क्लबकडे नगरपालिका शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी केली. त्या मागणीस रचना मालपाणी व प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी त्वरीत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांता शेंडे व पुष्पा राहणे यांनी केले. यावेळी  शिक्षण मंडळाचे जाहीद शेख, शिक्षक समितीचे कैलास गीते मुख्याध्यापिका चंद्रभागा जाधव, सप्तसिंधू खोसे, भारती भवार, परविन, फुलचंद लेंडे, वामनराव कळसकर, अर्जुन भवार, अरविंद सगभोर आदी उपस्थित होते.

COMMENTS