Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना छावा क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक ९ मधील लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वाटप

नाशिक प्रतिनिधी - आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व छावा क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक सविता करण गायकर यांच्या माध्यमातू

मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…
म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार
पढेगाव सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने समारोप

नाशिक प्रतिनिधी – आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व छावा क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक सविता करण गायकर यांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून आधार कार्ड नवीन मतदार नोंदणी यासह आयोजित शिबिरातील आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप प्रभाग ९ मधील छत्रपती शिवाजी महाराज नगर,श्रमिकनगर,धृवनगर आदी भागातील नागरिकांना वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,शिवसेनेचे शहर संघटक देवा जाधव,शिवसेना महिला आघाडीच्या सीमा डावखर,अलका गायकवाड,श्रुती नाईक,तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर,प्रमोद (अण्णा) जाधव,निवृत्ती पाटील शिंदे,सम्राट सिंग,महेश आहेर,छावा क्रांतिवीर सेना युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,विलास गायकवाड,संजय लोंढे,गिरीश आहेर महेश हिरे,प्रियंका  गायकर,डॉ.वृषाली सोनवणे,कांचन ताई देशमुख,मीनाताई देवकर,संपत गायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या महिना भरापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग ९ मध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी,नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती तसेच नवीन मतदार नोंदणी याबाबत शिबिर राबविण्यात येत आहे.परिसरातील नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत शेकडो नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला आहे.

 या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सत्कार आयोजक शिवसेना सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता करण गायकर,माजी नगरसेविका सौ.हेमलता कांडेकर,अविनाश गायकर,प्रितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मनोगत व्यक्त करतांना प्रभाग ९ मध्ये आजवर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर नगरसेवक निधीतून करण्यात आलेल्या स्थानिक कामाबद्दल प्रशंसा व्यक्त केली.या प्रभागात असलेल्या एका माजी लोकप्रतिनिधी व त्याच्या कुटुंबाची दहशत मोडीत काढून स्थानिक नागरिकांना न्याय देण्याची भूमिका असल्याची बतावणी यावेळी त्यांनी केली.मी म्हणजे या प्रभागाचा मालक अशी गुर्मी असलेल्या या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत चितपट करून प्रभागात भगवा फडकवनार असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अण्णा जाधव,शिवसेना शहर संघटक देवा जाधव,शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अलका गायकवाड,श्रुती नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार प्रभाग क्रमांक 9 शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजक सविता करण गायकर माजी नगरसेविका हेमलता दिनकर कांडेकर प्रियंका करण गायकर यांच्या वतीने करण्यात आला.

COMMENTS