Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलंगा येथे मिलींदनगरातील स्मशानभूमीची दूरवस्था

निलंगा प्रतिनिधी - शहरातील मिलींदनगर, बौद्धनगरमधील स्मशानभूमीचे नवीन बांधकाम करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष धम्मान

शिंदे सरकारमध्ये कोणी ही नाराज नाही – मंत्री अब्दुल सत्तार 
गोकुंदा स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद

निलंगा प्रतिनिधी – शहरातील मिलींदनगर, बौद्धनगरमधील स्मशानभूमीचे नवीन बांधकाम करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मिलींदनगर, बौद्धनगर या ठिकाणची समशानभूमी फार वर्षापूर्वीची जुनी असून त्या ठिकाणी सर्वच बाजूने पडझड झाली असल्याने अंत्यविधी करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. तेथे पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, गेट नाही, कसलीही स्वच्छता नाही, संरक्षण भिंती चारीही बाजूंनी मोडकळीस आल्या आहेत, आतमधील बांधकामास उभ्या भेगा पडल्या आहेत कोणत्याही क्षणी पडण्याची दाट शक्यता आहे.
सध्या बहुतांश ठिकाणी स्मशानभूमी अतिशय सुंदर,चांगल्या सुशोभीकरण केलेल्या दिसून येत आहेत मात्र या ठिकाणी आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नसल्यामुळे येथील समशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीचे बांधकाम करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी केली आहे.

COMMENTS