Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि. प. – ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती 

विस्तार अधिकारी कृषी या पदावर ९ तर विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदावर १ कर्मचाऱ्यास पदोन्नतीने पदस्थापना

नाशिक: नाशिक जिल्हा, ग्रामपंचायत विभागातील कार्यरत असलेले 10 ग्राम विकास अधिकारी या विस्तार अधिकारी (कृषी व ग्रापं ) पदी पदोन्नतीने पदस्थापना द

बार्शी येथे डिसेंबरमध्ये सहावे समतावादी साहित्य संमेलनाचे आयोजन – प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे
खा.अनिल बोंडे यांनी कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघ विधान परिषदेपासून वंचित

नाशिक: नाशिक जिल्हा, ग्रामपंचायत विभागातील कार्यरत असलेले 10 ग्राम विकास अधिकारी या विस्तार अधिकारी (कृषी व ग्रापं ) पदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20.10.2023 रोजी समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. समुपदेशनाने पारदर्शक रितीने पदोत्रती प्रक्रिया पार पाडल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, नाशिक यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. विस्तार अधिकारी (कृषी व ग्राप.) या पदावरील कर्मचान्यांना पदोत्रतीचा लाभ दिल्याने त्यांनी या बाबत समाधान व्यक्त केले.

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग दि. 01.08.2019 मधील तरतूदीनुसार पदोन्नतीस पात्र असलेले ग्राम विकास अधिकारी यांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने विस्तार अधिकारी (कृषी/ ग्रा.पं.) या पदावर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्री. रवींद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) डॉ. श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. योगेश पाटील, लेखाधिकारी श्री. रमेश जोधळे, श्री. प्रकाश बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक गट विकास अधिकारी, प्रशांत पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन पवार, वरिष्ठ सहाय्यक अशोक आहिरे, कनिष्ठ सहाय्यक योगेश बोराडे यांनी मेहेनत घेतली.

COMMENTS