Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि. प.शिक्षण विभागाच्या वतीने २२२ शिक्षकांना नियुक्ती आदेश 

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्

अन्यथा, दमण यंत्रणा मोकाट सुटतील !
राजधानीत प्रदूषणामुळे शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद
पिंपरी, चिंचवडचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी ही दि.४ व ५ रोजी पूर्ण झाली होती, कागदपत्रे पडताळणी झालेल्या २२२ शिक्षकांना आज प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र परदेशी, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज हे उपस्थित होते.

डी. एड., बी. एड. या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यताधारक टीईटी, सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र उमेदवारांनी मागील वर्षी पवित्र पोर्टलद्वारे नोंदणी केली होती, शिक्षक पदभरतीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलवरील ३२० पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार, मूळ कागदपत्रांची तपासणी/पडताळणी ४ व ५ मार्च रोजी करून त्यानंतर यादीतील १ ते २२२ पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले. गंगापूर रोडवरील होरायझन अॅकॅडमी सीबीएसई बिल्डिंग (केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर) येथे ही प्रक्रिया राबविली गेली. या सर्व प्रक्रियेत शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीधर देवरे, उप शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, वरिष्ठ सहायक सलीम पटेल, अरुण भदाणे, सरोज बागुल, विजया निकम, सुनील सोनवणे, जयवंत शिंदे, दीपक घोलप, कांतीलाल सोनवणे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रक्रियेत मेहनत घेतली. ६ व्या टप्प्यातील ४१ शिक्षकांना अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना ऑनलाइन शिक्षक बदली मध्ये सहाव्या टप्प्यात ज्या शिक्षकांच्या बदल्या ह्या अवघड क्षेत्रात झाल्या होत्या, अशा ४१ शिक्षकांना शासन निर्णयानुसार   अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या करण्यात आल्या.

COMMENTS