Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जातीय सलोखा बिघडवणे चुकीचे ः अजित पवार

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ज्या काही अनुचित घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. काही पक्षाचे लोक वाता

अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – महेश तपासे 
नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार
चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ज्या काही अनुचित घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. काही पक्षाचे लोक वातावरण शांत करण्याऐवजी वातावरण खराब करण्याचे दृष्टीने वक्तव्य करत आहे. राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस-गारपीट संकट, शेतकरी नुकसान भरपाई आदी बाबत लक्ष्य दिले जात नसल्याचे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केले. विभागीय आयुक्त कार्यलाय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीला डोळयासमोर ठेऊन मतदान करा असे आवाहन पंतप्रधान यांनी केले. परंतु कर्नाटकात लोकांनी तसे काही केले नाही. राज्यात अकोला, अहमदनगर, त्र्यंबकेशवर याठिकाणी घडलेल्या अनुचित घटना घडल्या नव्हत्या पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्‍वर मंदिरबाबत काही संघटना पुढे आल्या व त्यांनी गोमुत्र शिंपडणे प्रकार केला. अनेक वर्ष चालत आलेली त्याठिकाणची परंपरा आहे, त्यावरुन जातीय सलोखा बिघडविण्यात येऊ नये. आपली अनेक धार्मिक स्थळे, श्रध्दास्थान त्याठिकाणी लोक आनंदाने ये-जा करतात. त्याठिकाणी लोकांच्या मनात धार्मिक तेढ नसतो. जातीपातीच्या परंपरावरुन कोण तेढ निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाप्रकारे तेढ निर्माण कोण करत असेल तर मास्टर माइंडचा शोध घेतला पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करुन, दोन समाजात दरी निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवली जाते. राज्यात शांतता राखणे हे सरकारचे काम आहे असे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले.

सरकारने स्थानिक प्रश्‍नांवर लक्ष द्यावे- शेतकर्‍यांचे कांदा, कापूस पीक अडचणीत आले, त्यास भाव मिळत नाही याबाबत सरकारने लक्ष्य दिले पाहिजे. एसटीत महिलांना अर्ध तिकिट देण्या ऐवजी दैनंदिन गॅस सिलेंडरला अनुदान द्यावे. तुळाजपूर येथे विशिष्ट पोशाखात दर्शनास यावे याबाबत ते म्हणाले,कोणत्या देवाने सांगितले अर्धा चड्डीत आले तर दर्शन मिळणार नाही, भारतीय संस्कृती प्रमाणे वेगवेगळया धर्मात, जातीत विविध पेहराव घातला जात असतो. पेहराव योग्य असावा याबाबत दुमत नाही. उन्हाळयाचे सुट्टीत मुलांनी हाफ पँट घालून दर्शनास गेले तर त्यांना मंदीरा बाहेर ठेवले गेले याबाबत सरकार व स्थानिक प्रशासनाने लक्ष्य घातले पाहिजे. अशाप्रकारे नवीन प्रश्‍न निर्माण झाले नाही पाहिजे आणि नवीन पायंडे घातले गेले नाही पाहिजे, असा सल्ला देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

COMMENTS