Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार कीर्तिकर-संजय निरुपम यांच्यातील वाद कोर्टात

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांच्यातील राजकीय संघर्ष आता मुंबई उच्च न्यायालयात पो

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रवेशोत्सव फेरी उत्साहात
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केवळ शहरापुरतेच

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांच्यातील राजकीय संघर्ष आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. कीर्तिकर यांनी शिवसेना सोडून उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या जनादेशाचा अनादर केल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना शांततेत बाईक रॅली काढून किर्तीकरांच्या विरोधात जनतेत जायचे होते, मात्र वर्सोवा पोलिसांनी त्यांना दोनदा बाईक रॅली काढू दिली नाही.
संजय निरुपम म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार ’भारत जोडो यात्रे’ला घाबरले आहे. शांततापूर्ण मार्गाने ’बाईक रॅली’ काढून मला माझे मत जनतेसमोर मांडायची आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या सांगण्यावरून स्थानिक वर्सोवा पोलिसांनी मला बाइक रॅली काढण्याची परवानगी नाकारली. संजय निरुपम म्हणाले, दुपारी बाईक रॅली काढण्यात येईल, असे मी पोलिसांना सांगितले होते. जेणेकरून ट्रॅफिक जॅमसारखी समस्या उद्भवणार नाही. मात्र असे असतानाही पोलिस माझा आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेत आहेत. निरुपम यांनी त्यांचे वकील अशोक सरावगी यांच्यामार्फत न्यायालयात हा आरोप केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्या आरोपांना पोलिस उपायुक्त (झोन-11) कार्यालयाने रोखठोक उत्तर दिले आहे. ‘बाईक रॅली’ काढल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती आहे. याशिवाय राजकीय तणावही निर्माण होऊ शकतो. या प्रकाराचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, निरुपम यांची बाइक रॅली कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल. बाईक रॅलीमध्ये कोणत्या प्रकारच्या घोषणा दिल्या जाणार आहेत. याची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. याशिवाय नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये. या कारणांमुळे बाईक रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली नाही.

COMMENTS