Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य संघटनेमधून संपर्कप्रमुख हे पद बरखास्त  

करण गायकर यांचा राजीनामा मंजूर

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य संघटनेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर असणारे "संपर्कप्रमुख" हे पद छत्रपती संभाजी महाराज यांनी बरखास्त केले

आठवड्यातून एक दिवस मोबाइलचा उपवास करावा : डॉ. बावस्कऱ
साखर कारखाना विक्री घोटाळ्याचा खटला पारनेर न्यायालयात
अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य संघटनेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर असणारे “संपर्कप्रमुख” हे पद छत्रपती संभाजी महाराज यांनी बरखास्त केले असून करण गायकर यांचा या पदाचा राजीनामा मंजूर करीत असताना स्वतः छत्रपती संभाजी महाराज यांनी हा विशेष शेरा मारलेला आहे. 

रविवार, ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी करण गायकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र लिहून वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे स्वराज्य संघटनेच्या संपर्कप्रमुख, प्रवक्ता व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मंगळवार, दि. १० रोजी छत्रपती संभाजी महाराज यांनी गायकर यांचा संपर्कप्रमुख, प्रवक्ता व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर केला असून त्यांना या तिन्ही पदांवरून मुक्त केले आहे. तसेच, “संपर्कप्रमुख” हे पदही स्वराज्य पक्ष संघटनेच्या संघटनात्मक रचनेमधून बरखास्त करण्यात आलेले आहे.

COMMENTS