Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच

सीबीआयचा तपास अहवालातून स्पष्ट

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाला असून त्यामागे कोणताही घातपात किंवा तिची हत्या झालेली नाह

टोमॅटोचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता
अखेर महिला आयोगाकडून गावितांना नोटीस
कोयत्याच लोण शाळांपर्यत, दहावीचा पेपर सुटला अन् विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला 

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाला असून त्यामागे कोणताही घातपात किंवा तिची हत्या झालेली नाही, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास अहवालात केला आहे. सुशांतसोबत 28 वर्षीय दिशाने काही काळ काम केले होते. सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सीबीआयने सुशांतच्या मृत्यू प्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला. त्यात 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत 14 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हा अपघाती मृत्यू असल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात राजकीय वाद रंगला होता. या प्रकरणात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. आदित्य ठाकरेंवर हे आरोप करण्यात आले होते. यावरुन राजकारणही केले जात होते. दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आले? सचिन वाझेंना पोलिस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवले, असे आरोप नारायण राणेंनी केले होते.

ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासाठी ही चपराक आदित्य ठाकरे – दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते. याविषयी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, बरोबर आहे, पण या घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. त्या चिखलात मला पडायचे नाही. म्हणून ज्यांनी या प्रकरणात आरोप केले त्यांच्यासाठी हा अहवाल चपराक आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बिहार दौर्‍यावरही भाष्य केले. ते म्हणाले, मी पाटणा येथे जाणार आहे. खास करून तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे. आम्ही दोघेही 32-33 असे एकाच वयाचे आहोत. त्यांचे बिहारमध्ये चांगले काम सुरू आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. पर्यावरण आणि इतर त्यांनी हाती घेतलेल्या कामांवरही चर्चा होईल.

COMMENTS