मुंबई ः भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सोमवारी शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या 7 मंया
मुंबई ः भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सोमवारी शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या 7 मंयांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे हे प्रकरण भाजपला चांगलेच जड जाण्याचा दावा केला जात आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हास नगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे व संदीप सरवनकर आदी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यभर असे गुंड पाळलेत. शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुख्यमंत्री असतील तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्रीफडणवीस यांची भेट घेतली. त्यात त्यांनी गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार? कोणता निर्णय घेणार? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
COMMENTS