बेलापूर ः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण 73 हजार 186 शाखा असून समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणार्या 27 उपसंस्था आह

बेलापूर ः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण 73 हजार 186 शाखा असून समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणार्या 27 उपसंस्था आहेत त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत मग किल्लारीचा भूकंप असो, आसाम पुरग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अलीकडील कोरोना असो सर्वात आगोदर मदत कार्य पोहोच करणार्यामध्ये संघ प्रथम स्थानी असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोरख बारहाते यांनी व्यक्त केले.
विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बेलापुर शाखेच्या वतीने पथसंचलन तसेच बेलापुर जे टी एस हायस्कूलच्या प्रांगणात शस्र पुजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाँ.बारहाते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे तसेच उत्तर नगर जिल्हा कार्यवाह लहु शिंदे उपस्थित होते. प्रा. डाँ. गोरख बारहाते पुढे म्हणाले की, आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे संघ स्थापनेचा दिवस आज संघ स्थापनेला 98 वर्ष पुर्ण होत आहे .समाजासाठी सतत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ. लोक संघाविषयी उलट सुलट चर्चा करतात पण संघाचे कार्य शिस्तबध्द तसेच संघातील प्रत्येक स्वंयसेवक हा शिस्तप्रिय आहे संघ जात भेद मानत नाही संघाच्या परमपवित्र ध्वजाखाली सर्व समान असतात म्हणून तर संघाचे संघटन दिवसेंदिवस मजबुत होत चालले आहे आसेही प्रा, बारहाते म्हणाले, यावेळी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे म्हणाले की बाल तसेच तरुण मनावर संस्कार करणारा संघ हाच एकमेव परिवार आहे. आरएसएस एक संवाद आहे आज आपल्यातील समाजातील संवाद हरपत चालला आहे .संवादामधील स नाहीसा झाल्यामुळे केवळ वाद निर्माण होत आहे आपली भाषा शुद्ध हवी आपली भुषा पेहेराव चांगला पाहीजे ,आपले भोजन सात्वीक पाहीजे तसेच भ्रमण केले पाहीजे ते करताना निरीक्षण केले जावे या सर्व बाबी संघात शिकविल्या जात असल्याचेही देशपांडे म्हणाले प्रारंभी संघाचे घोषासह गावातुन संचलन काढण्यात आले होते.
COMMENTS