Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपुर अमृतचौक परिसरातील शिवनाल्यात घाणीचे साम्राज्य 

सातपुर - महानगरपालिका हद्दीतील सातपुर गावच्या पश्चिमेला त्र्यम्बकेश्वर रोड वरील अमृतचौक येथे असलेला पारंपारिक नाला हा शिवनाला  म्हणून ओ

शिवसेना संजय राऊत यांच्यामुळेच फुटली.
एमए बीएड धारकांना मानसेवी शिक्षक होण्याची संधी;लाभ घ्यावा – एस.एम.युसूफ़
निफाड येथे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांचे अध्यात्मिक प्रवचनाद्वारे विज ग्राहकांमध्ये जनजागृती

सातपुर – महानगरपालिका हद्दीतील सातपुर गावच्या पश्चिमेला त्र्यम्बकेश्वर रोड वरील अमृतचौक येथे असलेला पारंपारिक नाला हा शिवनाला  म्हणून ओळखला जातो. हा नाला पिंपळगाव बहुला व सातपुर यांची शिव अधोरेखित करतो. म्हणूनच की काय ? नगरपालिका हद्दीतील हा नाला आज रोजी पूर्णतः घाणीच्या साम्राज्याने व्याप्त  झालेला असून महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने येथील परिसरातील लोकांना त्रास सुरू असल्याची खळबळजनक माहिती परिसरातील रहिवाशी यांनी दिली आहेत. सातपुर विभागीय कार्यालयात या विषयी माहिती दिली असल्याचे स्थानिक रहिवाशी यांनी माहिती दिली असली तरी दोन ते तीन वर्षांपासून येथे कुणीही पालिका कर्मचारी फिरकत नसल्याची खंत व्यक्त होत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कर्मचारी यांनी कितपत लोकांचे म्हणणे आजवर एकूण घेतले,  हेच दुःख नेहमी लोकांना पचवावे लागते. होत असलेल्या घटनांना नेहमी कर्मचारी हे दुवा म्हणून काम बघत असतांना असे एखादे काम का दुर्लक्षीत होते हे लक्षात येत नाहीत.  मात्र त्याची देखरेख होणे गरजेचे आहेत , स्थानिक रहिवासी यांच्या म्हणण्यानुसार हा नाला एकंदरीत अंडरग्राऊंड जवळ पास ( ढोबळ) १००० मीटर मंजूर असून याचे काम केव्हा सुरू होईल याची शास्वती कुणी देत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शिवनाला हा वेळेवर दुरुस्त होणे गरजेचे आहेत पावसाळा सुरू होण्या आधी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत. ओपन नाला असल्याने सर्व त्रास सहन करावा लागतो. चौचालयाचे चेंबर येथे ओपन सोडल्याने हा त्रास न संपणारा आहेत . तसेच सकाळी घंटागाडी रोज येते मात्र स्थानिक तसेच बाहेर चे काही रात्री बे रात्री येथे कचरा टाकून जातात त्यामळे त्याची विल्हेवाट वेळेवर न होता आंबट घमघमाट सोसायटीत सुरू असतो.  श्री रामदास वनजी जाधव स्थानिक रहिवासी , अमृतचौक परिसर सातपुर 

COMMENTS