Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घंटागाडी येत नसल्याने बाबुर्डी रोड परिसरात घाणीचे साम्राज्य

संत सावतामाळी तरुण मंडळास वारंवार करावी लागते स्वच्छता

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा शहरातील बाबुर्डी रोड लगत अमरधाम स्मशान भुमी असुन या ठिकाणी अंत्यविधी साठी शहरासह प्रभाग पाच मधील नागरिक या स्मशान भुमीत

अकोले तालुक्यातून नंदिनी देशमुख मुलींमध्ये तालुक्यात प्रथम
विद्यार्थ्यांनी अगस्ती शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे ः नाईकवाडी
घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा शहरातील बाबुर्डी रोड लगत अमरधाम स्मशान भुमी असुन या ठिकाणी अंत्यविधी साठी शहरासह प्रभाग पाच मधील नागरिक या स्मशान भुमीत अंत्यविधीसाठी येतात शहरापासून जवळच असल्याने घंटागाडी येत नसल्याने शहराजवळील ग्रामस्थ घरातील कचरा, दुकानदार, हॉटेल चालक, जुन्या इमारतींच्या खराब  कचरा खराब झालेल्या पालेभाज्या या स्मशान भुमी जवळ रोड लगत आणुन टाकतात. रस्त्याने व अंत्यविधी साठी येणारा जाणारांना या ठिकाणच्या दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे.नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांना अनेक वेळा सांगुनही दुर्लक्ष केले जात आहे.
17 डिसेंबर रोजी श्री संत सावता माळी तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्ते नी बाबूर्डी रोड अमरधाम येथील स्वच्छता केली. यापूर्वीही संत सावतामाळी तरुण मंडळांनी येथील स्वच्छता केली आहे. नागरिकांनी नगरपरिषदेच्या नाकर्तेपणा मुळे नाराजी व्यक्त केली आहे.पुढील काळात नगरपालिकेने घंटागाडी सुरू करुन परिसरात कचरा टाकणारावर कारवाई करावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. यावेळी शिवसेना युवानेते किरण बनसुडे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस मयुर बनसुडे, किरण बनसुडे, प्रतिक बनसुडे, अभिषेक बनसुडे, वैभव बनसुडे, दिपक बनसुडे, सागर धाडगे, तुषार लष्करे, शिवाजी साळुंके, दादा डोके, अभि खेतमाळीस, तेजस खेतमाळीस, प्रेम औटी, प्राण देवकर, तेजस सुपेकर, अक्षय जगधने, सागर खेतमाळीस, यांच्यासह मंडळाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS