Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केदारेश्वर मंदिरात साजरा झाला दिपोत्सव

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील बन्सीलाल नगर परिसरात असलेल्या केदारेश्वर मंदिरामध्ये अधिक मासाच्या समाप्ती निमित्त दिपोत्सव साजरा करण्यात

सरकार आणि न्यायपालिका ! 
गुंतवणुकीच्या नावाखाली 712 कोटींची फसवणूक
जनताच भाजपचे ऑपरेशन करेल ः नाना पटोले

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील बन्सीलाल नगर परिसरात असलेल्या केदारेश्वर मंदिरामध्ये अधिक मासाच्या समाप्ती निमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एक हजारांपेक्षा जास्त पंत्या प्रज्वलीत करून दिव्यांच्या रोषणाईत केदारेश्वर शिवमंदिर लखलखले होते. या उपक्रमात महिला व भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
येथील केदारेश्वर मंदिरात अधिका मासाच्या निमित्ताने महिनाभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. महिना भराच्या कार्यक्रमानंतर दिपोउत्सवाने या अधिक मासाची सांगता झाली. देवल कमिटीच्या अध्यक्षा कमल बरूरे व त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बन्सीलाल नगर व परिसरातील महिला व भाविकांचा मोठा सहभाग होता.

COMMENTS