Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिंडोरी तालुका बनला बिबट्याचे माहेरघर

दिंडोरी प्रतिनिधी- तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संख्येत वाढ होऊन या बिबट्यानी उसाच्या शेतामध्ये आश्रय घेतल्यामुळे उसाचे शेत त्यांचे माहेर घर

सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
भाजपविरोधात मविआचे खलबते
दुकान  बंद असल्याचा फायदा घेत ज्वेलर्सच्या दुकानात टाकला दरोडा 

दिंडोरी प्रतिनिधी- तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संख्येत वाढ होऊन या बिबट्यानी उसाच्या शेतामध्ये आश्रय घेतल्यामुळे उसाचे शेत त्यांचे माहेर घर बनले आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कादवा नदी परिसरासह ओझे, करंजवण, म्हेळुस्के, बिबट्याने दहशत निर्माण केल्यामुळे शेतकरी वर्गासह मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तक्रार केलेल्या गावामध्ये पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऊसाच्या शेतात बिबटे आपल्या छोट्या पिल्लासह वास्तव्य करीत आहे. त्याप्रमाणे हा परिसर कादवा नदीचा असल्यामुळे बिबट्याना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. हे बिबटे दिवस रात्र कादवा नदी परिसरात भंटकती करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसा सुध्दा ऊसाला पाणी देण्याची शेतकर्‍यांची हिंमत होत नाही. सध्या हे बिबटे एवढे बिनधास्त झाले आहे कि, मळ्यात वस्तीवर असणार्‍या कुत्रे, मांजरे, वासरे या पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करीत असल्यामुळे या परिसरामधील पाळीव प्राण्यांची संख्या झपाट्याने घटताना दिसत आहे.

COMMENTS