Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगापुरातील दिंडीचे नेवासाफाट्यावर उत्स्फूर्त स्वागत

नेवासाफाटा: गंगापूर अर्थात जाखमाथा येथील श्री विठ्ठल आश्रमातील पंढरपूर पायी पालखी दिंडीचे शुक्रवारी 28 जून रोजी नेवासाफाटा येथील संताजी चौकामध्ये आगम

Sangamner : पठारावरील वाळूतस्करी काही केल्या थांबेना
हुकूमशाही रोखण्यासाठी काँग्रेसचा लढा ः बाबा ओहोळ
स्पर्धा परीक्षांचा पाया शिष्यवृत्ती परीक्षा तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचे प्रतिपादन

नेवासाफाटा: गंगापूर अर्थात जाखमाथा येथील श्री विठ्ठल आश्रमातील पंढरपूर पायी पालखी दिंडीचे शुक्रवारी 28 जून रोजी नेवासाफाटा येथील संताजी चौकामध्ये आगमन झाले. या दिंडीचे भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे दुपारच्या सत्रातील विसावा व महाप्रसादासाठी आगमन झाले असता जेष्ठ व्यापारी वभाजप ओबीसी मोर्चाचे मार्गदर्शक देविदास साळुंके व परिवाराच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. देवाचे चिंतन हेच मनुष्य जीवनाच्या कल्याणाचे साधन असल्याचे प्रतिपादन श्री.विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती हभप रामभाऊ महाराज राऊत यांनी यावेळी झालेल्या प्रवचनाप्रसंगी बोलताना केले.
नेवासाफाटा येथे श्री विठ्ठल आश्रम पालखीचे येथे आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.यावेळी जेष्ठ व्यापारी देविदास साळुंके कमलताई साळुंके यांनी हभप रामभाऊ महाराज राऊत यांचे स्वागत करून पालखीतील विठुरायाच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी बोलतांना हभप रामभाऊ महाराज राऊत म्हणाले की चित्ताचा व देवाचा संबंध आवश्यक आहे, चित्ताने देवाशी जवळीक होते,परमार्थ हा चित्ताचा विषय आहे, नामाद्वारे, रुपाद्वारे, लिलेद्वारे, चिंतन करता येते. पांडुरंगाचे चिंतन करणे हे मनुष्याच्या हिताचे साधन असून हे चिंतन अखंडपणे झाले पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी भाजपचे नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी हभप रामभाऊ महाराज राऊत यांचे संतपूजन करून दर्शन घेतले. यावेळी प्रगतशील शेतकरी धोंडीराम सर्जे, विठ्ठलराव साळुंके, ब्रम्हा साळुंके, जनार्धन जाधव, शिवाजी हारदे, सोमनाथ शेंडे, युवा नेते सचिनभाऊ देसरडा, ज्ञानेश्‍वर माऊली पेचे, तहसीलदार स्नेहा साळुंके, प्रीतम साळुंके, आदिनाथ पटारे, उदयकुमार बल्लाळ, अशोक कदम, भाजपचे युवा नेते मनोजअण्णा पारखे, जनाभाऊ पटारे, बद्रीनाथ सर्जे, केदार सर्जे, राजूभाऊ घोंगते, सुप्रिया साळुंके, निलेश साळुंके, भागवत साळुंके, नारायण साळुंके, भास्कर साळुंके, अशोक साळुंके, हरिभाऊ शिंदे, शंकर शिंदे सुभाष शिंदे, फकीरचंद उगले, मुरली साळुंखे यांच्यासह पावन गणपती मंदिर भक्त परिवारातील सर्व भाविक भक्त व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS