जितेंद्र आव्हाडांनी खरंच महिलेला धक्का दिला का? त्यावेळी नेमकं काय घडलं?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांनी खरंच महिलेला धक्का दिला का? त्यावेळी नेमकं काय घडलं?

महिला कार्यकर्त्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे प्रतिनिधी - हर हर महादेव चित्रपटावरून सुरु असलेल्या गोंधळामुळे, प्रेक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आधीच वादात स

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही

ठाणे प्रतिनिधी – हर हर महादेव चित्रपटावरून सुरु असलेल्या गोंधळामुळे, प्रेक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आधीच वादात सापडले असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता जितेंद्र आव्हाडांवर भाजप महिला कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा आरोप केला गेलाय. आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद या भाजप महिला कार्यकर्त्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. मुंब्रा वाय ब्रिज येथील उद्घाटनावेळी ही घटना घडली आहे. गर्दीच्या वेळी आव्हाडांनी जाणूनबुजून माझ्या दोन्ही खांद्याला धरून बाजूला ढकलल्याचा महिलेनं आरोप केलाय. दरम्यान याबबातचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असेलल्या महिला भाजप कार्यकर्त्याला जितेंद्र आव्हाडांनी बाजूला सारलं. या प्रसंगावरून महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

COMMENTS