।संगमनेर : गुवाहाटी येथे पार पडलेल्या पाचव्या सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्या ध्र

।संगमनेर : गुवाहाटी येथे पार पडलेल्या पाचव्या सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलने दहा सुवर्ण पदकांसह सर्वसाधारण चॅम्पियनशिपचा किताबही पटकावला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणार्या रोहन तायडे व रुद्राक्षी भावे यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप देवून त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला.
या संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर रोहन तायडे व रुद्राक्षी भावे यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिपचा तर, महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलला सर्वसाधारण चॅम्पियनशिपचा किताब देवून सन्मानीत करण्यात आले. योग प्रशिक्षक विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व काजल ताजणे यांनी ध्रुवच्या योगासनपटूंना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS