Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढोरजेत महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांची संयुक्त जयंती उत्साहात

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंच तसेच ग्रामस्थ ढोरजे यांच्यावतीने गुरु शिष्य संयुक्त जयंती सामाजिक उ

रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत
पाण्यासाठी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंच तसेच ग्रामस्थ ढोरजे यांच्यावतीने गुरु शिष्य संयुक्त जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांत चव्हाण सर हे होते तर अध्यक्षस्थानी भास्कर रणसिंग हे होते.
यावेळी मंचकावर संपत रणसिंग, दयानंद पारधे, राजू रणसिंग, मधुकर रणसिंग, दिवाकर रणसिंग, किसन रणसिंग, दादू गरुड, प्रकाश भोईटे, भाऊ भालेराव, नाना कांबळेसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिक्षा आढाव, ईशाय हिवाळे, अमोल रणसिंग, विशाल बनसोडे, सुरज घोडके, सतीश ओहोळ, अमोल कोहक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव रणसिंग यांनी तर आभार प्रदर्शन विनोद जालिंदर उजागरे यांनी केले.

COMMENTS