देवळाली प्रवरा ः राहुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बारागाव नांदूर येथील सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेतामध्ये पाच बिबट्यांचा वावर आढळून आ
देवळाली प्रवरा ः राहुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बारागाव नांदूर येथील सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेतामध्ये पाच बिबट्यांचा वावर आढळून आला होता. त्यानंतर सदर बिबट्यांबाबत सचिन लक्ष्मण म्हसे यांनी वन विभागाला माहिती कळवली वनविभागाने या ठिकाणची पाहणी करून म्हसे यांच्या शेत वस्तीवर 1 पिंजरा लावण्यात आला. परंतु पिंजरा बसवल्यानंतर देखील सुमारे एक महिन्यात या पिंजर्यामध्ये बिबट्या अडकला नाही. त्यानंतर शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पिंजर्यात बिबट्या अडकला.बिबट्या अडकल्यानंतर त्याच्या आवाजाने दुसरा बिबट्या देखील त्या ठिकाणी येऊन पिंजर्या सभोवताली फिरता सिसिटीव्हीमध्ये कैद झाला. अडकलेल्या बिबट्याने पिंजर्याच्या दरवाजाला धडका मारुन वन विभागाचे कुचकामी ठरलेल्या पिंजर्याचा दरवाजा तुटल्याने बिबट्याने बाहेर धूम ठोकली.
रविवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा दुसरा बिबट्या पिंजर्यात अडकला मात्र कुचकामी ठरलेल्या पिंजर्याच्या दरवाजामुळे दुसरा अडकलेला बिबट्या पिंजर्याच्या बाहेर आला आणि धुम ठोकली हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे . वन विभागाच्या कुचकामी पिंजरे व गलथान कारभारामुळे हा बिबट्या निसटलाचा आरोप सचिन म्हसे यांनी केला आहे. सचिन म्हसे यांच्या शेतवस्ती च्या आसपास बिबटे असल्याचे सीसीसीटिव्ही मध्ये कैद झाले असल्याने वन विभागाने चांगल्या स्थितीतील पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सचिन लक्ष्मण म्हसे यांनी केली आहे. वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नविन अधुनिक पद्धतीचे पिंजरे खरेदी करावेत जेणे करुन पिंजर्यात अडकलेला बिबट्या पुन्हा पिंजर्याच्या बाहेर येणार नाही. राहुरी शहरापासून जवळच बिबट्यांचा वावर असल्याने कालांतराने शहरात देखील या बिबट्यांचा उपद्रव होऊ शकतो असे सुज्ञ नागरिकांनी सांगितले वनविभागाने वेळेत या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिक करीत आहेत.
COMMENTS