Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खूनातील संशयिताचा सांगली जिल्हा रुग्णालयात धिंगाणा

सांगली / प्रतिनिधी : कॉलेज कार्नरजवळील कॅफेसमोर गुंड नवनाथ लवटे याचा संशयित योगेश दिलीप शिंदे (वय 25, लक्ष्मी मंदिरजवळ, हडको कॉलणी) याने नशेतच खून के

देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
जागतिक एड्स दिनानिमित्त सातारा शहरात प्रबोधनपर रॅली
अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक

सांगली / प्रतिनिधी : कॉलेज कार्नरजवळील कॅफेसमोर गुंड नवनाथ लवटे याचा संशयित योगेश दिलीप शिंदे (वय 25, लक्ष्मी मंदिरजवळ, हडको कॉलणी) याने नशेतच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्याने त्याठिकाणी धिंगाणा घातला. त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, नशेतून बाहेर आल्यानंतर खूनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी रस्त्यावरील उत्तर शिवाजीनगरमध्ये एका कॅफेच्या समोर रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ लवटे याचा धारदार गुप्तीने हल्ला करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. हल्ल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी रेकॉर्डवरील गुंड योगेश शिंदे याला ताब्यात घेतले. तेंव्हा तो नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेंव्हा त्याने तेथे नशेत धिंगाणा घातला. पोलीस पथकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. परंतू नशेचा अंमल असल्यामुळे त्याने आदळ-आपट करण्याचा प्रयत्न केला. त्याला शुध्दीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर होती. परंतू तो आजही नशेच्या अंमलात होता. तो नशेतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर तपास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आज दुसर्‍या दिवशीही खूनाचे कारण गुलदस्त्यात राहिले. शुध्दीवर आल्यानंतर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत. दरम्यान, नवनाथ याच्या खुनानंतर त्याचा भाऊ गोरखनाथ लवटे यांने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयितासाठी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त
संशयित शिंदे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री त्याने रुग्णालयात धिंगाणा घालत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या वॉर्डाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागला.

COMMENTS