Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरुवात

मुंबई / प्रतिनिधी : धर्मवीर 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 2022 ला आलेल्या धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. धर्मवीर सिनेमात

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड काय घेणार भूमिका ; स्वतंत्र आघाडी की राष्ट्रवादी ?
पिकविमा भरपाई मिळण्यासाठी मतदारसंघात पाहणी सुरु ः आ.काळे
कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

मुंबई / प्रतिनिधी : धर्मवीर 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 2022 ला आलेल्या धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांची कहाणी पाहायला मिळाली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे सिनेमात पाहायला मिळाले. आज धर्मवीर 2 ची सुध्दा घोषणा झाली होती. धर्मवीर 2 चा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

धर्मवीर 2 च्या शुटींग मुहूर्ताला अभिनेता प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. पहिल्या भागात आनंद दिघे यांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ज्यात शेवटी दिघे यांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसर्‍या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्‍न प्रेक्षकांना पडला असेल. धर्मवीर 2’ मधून उलगडणार ’साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट… असे कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS