Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनावर धनगर मेंढपाळ बांधवाची पदयात्रा

यवतमाळ येथून पदयात्रेला सुरुवात

यवतमाळ प्रतिनिधी- धनगर मेंढपाळ समाजाच्या समस्या वर्षांनुवर्षांपासून शासनाकडे मांडल्या जात आहेत. परंतु, त्याची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. मा

रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली
भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सरचे निदान
महाराष्ट्रासह देशभरात ईडीने घेतली झाडाझडती

यवतमाळ प्रतिनिधी– धनगर मेंढपाळ समाजाच्या समस्या वर्षांनुवर्षांपासून शासनाकडे मांडल्या जात आहेत. परंतु, त्याची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाची पदयात्रा धडक देणार आहे. या पदयात्रेची सुरुवात यवतमाळातून झाली. या पदयात्रेत हजारो धनगर मेंढपाळ बांधव सहभागी झालेत. कायम स्वरूपी चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, बाळूमामांच्या नावाने घरकूल योजना लागू करावी, पदवीपर्यंत मोफत शिक्षण, समाजाच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात तीन हजार कोटींची तरतूद करावी  आदी मागण्यांचा समावेश आहे. 

COMMENTS