Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

महसूलमंत्री विखेंच्या अंगावरच उधळला भंडारा

सोलापूर/प्रतिनिधी ः राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक गेल्या 11 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण करत असतांना,

धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण
धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

सोलापूर/प्रतिनिधी ः राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक गेल्या 11 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण करत असतांना, आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक होतांना दिसून येत आहे. आंदोलकांनी शुक्रवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यावेळभ जवळील सुरक्षा रक्षकांनी त्या आंदोलकाला चांगलाच चोप दिला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे जिल्हा दौर्‍यावर आहेत. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांनी त्यांची वेळ मागत त्यांना भेटण्याची विनंती केली. पोलिसांच्या मार्फतच विखे यांनी आंदोलकांना भेटण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते विखे पाटील यांना भेटण्यासाठी शांततेत विश्रामगृहामध्ये आले होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी विखे पाटील उठून उभे राहिले आणि त्यांच्या मागण्यांची चौकशी केली. त्यावेळी धनगर समाजाचे आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. ते निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे याने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्यासह येथे उपस्थित सर्वच गोंधळले होते. हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनीच त्याला सोडवण्याचे निर्देश दिले.

पवित्र भंडार्‍याची उधळण हा माझ्यासाठी आनंदच – भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडार्‍याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. अचाकनपणे ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला. त्यांची ती जबाबदारीच असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तरी मी सूचना दिल्या आहेत की गुन्हा वगैरे दाखल करू नका. कोणतीही कारवाई न करण्याच्या निर्देश राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.

COMMENTS