Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“नमामि वैद्यनाथम्” कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभर प्रभू वैद्यनाथाचे महत्त्व सांगण्याचा धनंजय मुंडेंचा संकल्प 

बीड प्रतिनिधी - बीडच्या परळीतील पंचमद्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे महत्व "नमामि वैद्यनाथम्" कार्यक्रमाच्या माध्यमातून 11 ज्योतिर्लिंगाच्

योग्य काळजी, नियमित तपासणीतून नेत्र विकार ठेवा दूर
औरंगाबादमध्ये उभारणार पहिले महिला कृषी महाविद्यालय
नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल

बीड प्रतिनिधी – बीडच्या परळीतील पंचमद्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे महत्व “नमामि वैद्यनाथम्” कार्यक्रमाच्या माध्यमातून 11 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी घेवून जाण्याचा संकल्प धनंजय मुंडे यांनी केलाय. गुढी पाड्यानिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात आयोजीत “नमामी वैद्यनाथम्” कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

वाराणसी आणि काशी पेक्षा परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे महत्त्व काकणभर जास्त आहे. माञ काही लोकांना धाम आणि ज्योतिर्लिंग यातील फरक कळला नाही. त्यामूळे झारखंड येथील बैद्यनाथ धामला केंद्र सरकारच्या गॅझेट मध्ये समावेश केला. आमचे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पळून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मी प्रभू वैद्यनाथ भक्त या नात्याने ते परत मिळवल्या शिवाय राहणार नाही. आणि ते परत आणण्याची ताकत माझ्यात असल्याचं मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत “नवामी वैद्यनाथम” या खास संगीतमय शिवपूजनाचं आयोजन परळीत करण्यात आलं. ‘हर हर शंभू’ या लोकप्रिय गीताच्या गायिका अभिलिप्सा पांडा, गायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, गायक आणि संगीतकार स्वप्नील गोडबोले आणि इंडियन आयडल फेम प्रतीक सोळशे या कलाकारांनी परळीकरांना संगीताने मंत्रमुग्ध केले. दरम्यान स्वतः धनंजय मुंडे यांनी प्रेक्षकात बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. 

COMMENTS