नाशिकः सणांची उधळण करून सृष्टीत चैतन्य पेरणार्या श्रावण महिन्याच्या अखेरीस येणारा 'बैलपोळा' सण म्हणजे जगाच्या पोशिंद्यांना ऋण व्यक्त करून त्यांच
नाशिकः सणांची उधळण करून सृष्टीत चैतन्य पेरणार्या श्रावण महिन्याच्या अखेरीस येणारा ‘बैलपोळा’ सण म्हणजे जगाच्या पोशिंद्यांना ऋण व्यक्त करून त्यांचा कृपाशिर्वाद मिळविण्याचा हा सण आहे. भारतीय सणांची परंपरा आणि त्यांचे वैविध्य जपत मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर व प्राथमिक शाळेमध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक शेतकरी वेशभूषा साकारत बैलपोळ्याचा नैवेद्य सर्जा राजाला भरवला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश सुखदेव कोल्हे संस्था, सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती प्रकाश कोल्हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैलांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे महत्त्व समजावून सांगताना प्रकाश कोल्हे म्हणाले की, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी म्हणजे बळीराजा वर्षभर शेतात राबून, उरसूर घरात ठेवून चांगलं धन-धान्य कवडी मोल भावाने देऊन टाकतो. ओंजळीतलं दान देण्यासाठी तत्पर असणारा शेतकरी राजा आणि त्याचा एकमेव सखा म्हणजे बैलराजा. या सणाचं महत्त्व समजून बळीराजाच्या कष्टाचं मोल आपण जपूया.’ ज्योती कोल्हे यांनी व्यसनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोलभाव करताना त्यांच्या कष्टाची आठवण ठेवून त्यांच्या लेकरांच्या चेहर्यावर हास्य फुलवूया ! बळीराजा सुखी तर आपण सुखी.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज कुवर यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकवृंद उपस्थित होते.
COMMENTS