Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली :महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनीं आपल्या साडेतीन दश

मॅक्सिको शहर हादरलं !
विधानपरिषदेचा दहा जागेचा आज फैसला | DAINIK LOKMNTHAN
समाजमाध्यमांवरील असत्यामुळे सत्याचा बळी

नवी दिल्ली :महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनीं आपल्या साडेतीन दशकांहून अधिक काळातील गौरवशाली कारकिर्दीत विविध पदांवर काम केले आहे.
डीजी परमेश शिवमणी हे दिशादर्शन आणि संचालन यातील तज्ज्ञ असून त्यांच्या सागरी जबाबदारीत भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व प्रमुख नौकांवर त्यांनी काम केले आहे. यात प्रगत ऑफशोर गस्ती जहाज ’समर’ आणि ’विश्‍वस्त’ यांचा समावेश आहे. फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनी तटरक्षक क्षेत्र (पूर्व), तटरक्षक क्षेत्र (पश्‍चिम), तटरक्षक दल कमांडर इस्टर्न सी बोर्ड इथले प्रमुखपद भूषवले आहे. ते नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत. परमेश शिवमणी यांना सप्टेंबर 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना तटरक्षक दल मुख्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे ऑगस्ट 2024 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. या कालावधीत अनेक मोहिमा आणि सराव पूर्ण करण्यात आले. यात मादक द्रव्य/अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती आणि किनारी सुरक्षा सरावादरम्यान मानवतावादी साहाय्य, तीव्र चक्रीवादळात खलाशांची सुटका, परदेशी तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, प्राण्यांच्या तस्करीविरोधात कारवाई, यांचादेखील यात समावेश आहे. फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल 2014 मध्ये तटरक्षक पदक आणि 2019 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक प्रदान करण्यात आले. त्यांना 2012 मध्ये डीजी तटरक्षक दल प्रशंसा आणि 2009 मध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पूर्व) प्रशंसा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहेत.

COMMENTS