Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रभागेच्या पात्रातील खड्ड्यांमुळे भाविकांच्या जीवाला धोका 

  सोलापूर प्रतिनिधी - जेव्हा होती चंद्रभागा तेव्हा नव्हती गोदागंगा असे पंढरीच्या चंद्रभागेची महती आहे. ज्या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर मुक्

येरवळे येथील सुरज यादव जवान आसाममध्ये शहिद
नाराज नातवाने आजोबांवर केला फावड्याने वार l
नदी जिवंत उपक्रम राज्यात राबवून पुढील पिढ्याना जीवनदान द्यावे ;- प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे

  सोलापूर प्रतिनिधी – जेव्हा होती चंद्रभागा तेव्हा नव्हती गोदागंगा असे पंढरीच्या चंद्रभागेची महती आहे. ज्या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर मुक्ती मिळते असे म्हटले जाते तीच चंद्रभागा आज भाविकांच्या जीवावर उठली आहे. वर्षभरात स्नानासाठी गेल्या भाविकांना शेकडो भाविकांचा याच चंद्रभागेतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंढरपुरातील चंद्रभागेचे वाळवंट आता नामशेष होण्याच्या मार्गावर असताना आता नदीपात्रातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात अनेक खड्डे पडले आहेत. हेच खड्डे भाविकांच्या जीवावर उठले आहेत. काल एकाच दिवसात नदीपात्रातील खड्ड्यांतील पाण्यात बुडवून दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता चंद्रभागा नदीपात्रातील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक वेळा नदीपात्रातील खड्ड्यांमुळे  भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार अशा घडणाऱ्या घटनांमुळे चंद्रभागा स्नानासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून नदी पात्रातील वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्डे आता भाविकांच्या जीवावर उठले आहेत. महसूल प्रशासनाने चंद्रभागा नदी पात्रातून होणारा  अवैध वाळू उपसा तातडीने थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक यांनी दिला आहे.

COMMENTS