Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवृत्तीनाथ दिंडी पालखी सोहळ्याचे देवळाली प्रवरा स्वागत  

देवळाली प्रवरा : आषाढीचे वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते.भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा "याचि

यलम प्रिमिअर क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स अजिंक्य
पिएम स्वनिधी योजनेतून नांदेड शहरातील फेरीवाल्यांना मिळाली उभारी
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या : मुंडे
Displaying 1004956348.jpg

देवळाली प्रवरा : आषाढीचे वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते.भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा “याचि देही याचि डोळा” श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत होत आहे. देवळाली प्रवरा (ता. राहुरी ) येथे शुक्रवार (दि. २० ) दुपारी दिंडीचे आगमन झाले. या दिंडीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा सहभाग  असून, ४२ उपदिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत.यावर्षी स्वच्छ वारी,निर्मल वारी हि संकल्पना घेवुन दिंडीने प्रस्थान ठेवले असल्याचे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष निलेश महाराज गाढवे यांनी सांगितले.

           निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे भोई होण्यासाठी  “याचि देही याचि डोळा” व दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी दिंडीमार्गात ठिकठिकाणी हजारो भाविकांची गर्दी होत आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून दिंडीने प्रस्थान केले. नंतर मजल दरमजल करत निवृत्तीनाथांची दिंडी शुक्रवार दुपारी देवळाली प्रवरा शहरात आगमन झाले दोन तासाच्या विसाव्या नंतर राहुरीच्या मुक्कामाच्या दिशेने दिंडी मार्गस्थ होते.

             गुरवार बेलापूर ता.श्रीरामपूर येथिल मुक्कामा नंतर शुक्रवारी  सकाळी राहुरीच्या मुक्कामाच्या दिशेने दिंडी मार्गस्थ होते. बेलापूर ते देवळाली प्रवरा या प्रवासा दरम्यान अनेक ठिकाणी दिंडीचे स्वागत केले जाते.या भागात विविध ठिकाणी वारकऱ्यांची जेवणाची व चहा पाणाची व्यवस्था केली जाते. देवळाली प्रवरातील चव्हाण वस्ती येथे पालखीला विसावा दिला जातो. या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. राहुरी तहसिलच्या वतीने तहसिलदार नामदेव पाटील व मंडलाधिकारी भिमराव मंडलिक, कामगार तलाठी अंबादास आरले,संतोष चव्हाण, राजेंद्र चव्हाण, यांनी दिंडीचे स्वागत केले. देवळाली प्रवरा बाजारतळावर देवळाली प्रवरा शहराच्या वतीने मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील,माजी आ.चंद्रशेखर कदम,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, गोपाल भोर,दिनकर पवार,वैभव ठोंबरे,निखिल नवले,भुषण झरकर, रामदास म्हस्के,अमोल जाधव,भुषण नवाल,बाबा सांबारे, मंजाबापू वरखडे,कांता कदम यांनी  दिंडीचे स्वागत करुन पालखी खांद्यावर घेवून काकासाहेब चौकातील मारुती मंदिरात दर्शनासाठी पालखी ठेवली जाते. यावेळी दिंडी समवेत पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे,निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष अँड सोमनाथ घोटेकर, माजी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ,माजी अध्यक्षा कांचनताई जगताप,विश्वस्त राहुल साळुंखे,पालखी सोहळा मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे,जयंत महाराज गोसावी,मोहन महाराज बेलापूरकर आदी उपस्थित होते.देवळाली प्रवरा नगर पालिका व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधो उपचार देण्यात आले.  

       पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चारुदत्त खोंडे, प्रमोद ढाकणे,अदिनाथ पाखरे, हनुमंत आव्हाड,अशोक शिंदे, महिला पोलिस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

COMMENTS