Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळा ग्रामपंचायत उपसरपंचपदी दत्ता साळुंके

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई तालुक्यातील देवळा ग्रामपंचायत उपसरपंच पदी दत्ता साळुंखे यांची निवड झाली सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जनतेच्या

महिलांना एस टी बस मध्ये 50 % सुट दिल्याच्या विरोधात टॅक्सी चालक संघटने कडून आंदोलन
परिवारातील नाते भावनांच्या धाग्याने बांधले तर कधीच तुटणार नाहीत – प.पू.डॉ.गौरवमुनी
प्रदूषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई तालुक्यातील देवळा ग्रामपंचायत उपसरपंच पदी दत्ता साळुंखे यांची निवड झाली सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाणारे दत्ता साळुंखे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने गावकर्‍यांनी फटाके वाजवत आनंद उत्सव साजरा केला
अंबाजोगाई तालुक्यात डिसेंबर महिन्यात 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या देवळा ग्रामपंचायत मध्ये रावसाहेब नाना यादव जनतेतून सरपंच पदी निवडून आले उपसरपंचाची निवड ही झाली उपसरपंच पदासाठी दत्ता साळुंख इच्छुक होते ऐनवेळी दत्ता साळुंखे ऐवजी दुसर्‍यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली दत्ता साळुंखे यांना उपसरपंच न केल्याने ग्रामपंचायत सदस्य मध्ये नाराजी निर्माण झाली. ग्रामपंचायत मध्ये इतर सदस्य नाराज झाल्याने विद्यमान उपसरपंचाने राजीनामा दिला होता उपसरपंच पद रिक्त झाल्याने ता. पाच बुधवार रोजी सरपंच रावसाहेब नाना यादव यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक जी. व्ही. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा घेण्यात आले उपसरपंच पदासाठी दत्ता साळुंखे आणि कल्याण पवार यांचे दोन आर्ज आले या निवडीत दत्ता साळुंखे यांना सहा मते तर कल्याण पवार यांना चार मते मिळाली या निवडीत दत्ता साळुंखे यांची उपसरपंच पदी निवड झाली सामाजिक कार्याता अग्रेसर असणारे दत्ता साळुंखे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी  कोमल  यशवंत, मोनिका सोनवण,सुमन  देडे, दतू सगट बाबासाहेब लांडगे ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्य समर्थक उपस्थित होते

COMMENTS