Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज

लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन पूर्ण

नेवासा प्रतिनिधी - कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड नगरी सज्ज झाली असून मंगळवारी होणाऱ्या मुख्यय उत्सवास

LokNews24 lशेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध
वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात
अहमदनगरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

नेवासा प्रतिनिधी – कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड नगरी सज्ज झाली असून मंगळवारी होणाऱ्या मुख्यय उत्सवासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख  महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या अधिपत्याखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी सर्व नियोजन पूर्ण झाले असल्याचे देवगड संस्थानच्या वतीने सांगण्यात आले अमृतवाहिनी प्रवरामाईच्या पवित्र नदीच्या काठी श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबांनी आपल्या दिव्य तपश्चर्येच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयांना येथे प्रकट करून घेतले.आज श्री क्षेत्र देवगड हे भक्तांच्या उध्दाराचे आध्यत्मिक पीठ बनले आहे.गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या संकल्पनेतून भक्तांच्या श्रद्धेच्या पाठबळावर देवगड भू-लोकीचा स्वर्ग बनला आहे.


  भगवान दत्तात्रयांसह उत्तर बाजूस भगवान सिद्धेश्वर व कार्तिक स्वामी विघ्नहर्ता गणेशाच्या मंदिराबरोबरच दक्षिण दिशेस श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येथे लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते त्या पार्श्वभूमीवर गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी सर्व सुविधा व्यवस्था देवगड संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.परीसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे.कार्तिक पौर्णिमेला येथील प्रांगणात यात्रा भरत असल्याने यात्रेत  दुकानदारांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने  मंगळवारी दि.८ नोव्हेंबर रोजी पहाटे वेदमंत्राच्या जयघोष करत गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांसह भगवान कार्तिक स्वामींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार असून दुपारी १२ वाजता महा आरतीचे व त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले आहे.कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने देवगड नगरीत होणाऱ्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 

COMMENTS