भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आहे, जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत आपण अविरतपणे काम करणार असू
भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आहे, जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत आपण अविरतपणे काम करणार असून विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देऊ, जनता योग्य अयोग्य जाणते आहे, जनसामान्यांचा विकास हीच जबाबदारी समजून आपले अविरतपणे कार्य चालू असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई रस्त्यावरील भातकुडगाव फाटा ते गेवराई रस्त्यावरील नित्यसेवा हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. अमरापूर शेवगाव रस्ता 200 लक्ष, वडुले शेवगाव रस्ता 165 लक्ष, भातकुडगाव फाटा गेवराई रोड (नित्यसेवा हॉस्पिटल ) 725 लक्ष या कामाचा शुभारंभ त्यांनी रविवारी केला. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या मध्यंतरीच्या कालावधीत शासनाने निधी न दिल्याने रस्त्याच्या प्रश्नावर जनसामान्यांना उत्तर देणे अवघड झाले होते. परंतु शिंदे – फडवणीस सरकार सत्तेवर आल्यानंतर खोळंबलेली विकास कामे सुरू झाली आहेत. अंगणवाडी सेविका- मदतनीस, कोतवाल बंधू यांचे मानधनात शासनाने वाढ केली आहे, केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे राज्य शासनाने शेतकरी सन्मान निधी सुरू केला आहे, महिलांना एसटी बस च्या प्रवासात 50 टक्के सवलत दिले आहे तसेच आता शेतकर्यांना एक रुपयात पिक विमा भरता येईल. केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कार्य सुरू आहेत, सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून केंद्रातील मोदी शासन व राज्य शासन काम करत आहे, जलसामान्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत. या कार्याची माहिती सर्वसामान्य देणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, सा.बां. उप अभियंता प्रल्हाद पाठक, आशाताई गरड, रवींद्र सुरवसे, सुनील रासने, नगरसेवक सागर फडके गणेश कोरडे, शब्बीर शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, वाय डी कोल्हे, कचरू चोथे, गंगाभाऊ खेडकर, भीमराजजी सागडे, उमेशराव भालसिंग, हाजी सालार शेख, शिवाजीराव भिसे, सुभाषराव बडदे, निळकंठ कराड, संभाजी कातकडे, अमोल सागडे, संभाजी काटे, डॉ नीरज लांडे, डॉ श्याम काळे, हरीश भारदे,युवा नेते संदीपराव खरड, कानिफनाथ ढाकणे, संजय खरड, रामहरी घुले आप्पासाहेब आवटी, सुरेशभाऊ नेमाने, किरण पवार, सचिन म्हस्के, महेश काळे, नारायणराव मडके, महादेव पवार, अनिल वडागळे, कैलास सोनवणे सर, डॉक्टर मल्हारी लवांडे, किरण काथवटे, मारुती भागवत, बाबासाहेब धस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण देवढे सर यांनी केले व सुभाषराव बरबडे यांनी आभार मानले.
COMMENTS