Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात

देवळाली प्रवरा ः मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 40 मुस्लीम बांधवांनी  रक्तदान केले.  मुस्लिम ध

मशीराने धरला रमजानचा उपवास
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
ओव्हरलोड वाहनावर कडक कारवाई करणार्‍या महिला उप प्रादेशिक अधिकार्‍यास दमदाटी

देवळाली प्रवरा ः मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 40 मुस्लीम बांधवांनी  रक्तदान केले.  मुस्लिम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त देवळाली प्रवरा येथे एम युनिटी फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने  ईदगाह मैदानावर शहरातील तरुण मुस्लीम समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचा शुभारंभ आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व अजिज शेख यांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्याने रक्तदान करण्यासाठी सर्वाधिक तरुणांनी पुढाकार घेतला. पैगंबर जयंती निमित्त अन्नदान करण्यात आले तसेच प्रार्थना स्थळाची स्वच्छता ठेवणार्‍या मोअज्जिन यांना मुस्लिम समाजाचा वतीने सायकल भेट देण्यात आली. पैगंबर जयंती  साजरी करण्याचे चोख नियोजन एम युनिटी फाऊंडेशनचे अफसर शेख, फिरोज भाई मित्र मंडळ, अर्सदभाई शेख, याचा वतीने करण्यात आले. रक्तदान शिबीरात 40 तरुणांनी रक्तदान केले. यावेळी अल्तमश शेख, सलीम शेख, दानिश बागवान, फय्याज शेख्, रिजवान शेख, शकील शेख, हाजी मुनीर शेख, अलताब शेख, कय्यूम शेख, इमरान शेख, असलम् शेख, मौलाना उमर शेख, मौलाना रियाज शेख, मौलाना अब्दुल लतीफ शेख, अजीज शेख, खालिद शेख, शाहेबाज बागवान, शाहरुख़ शेख, जीशान शेख, अरशद पठान आदी उपस्थित होते. 

COMMENTS