Homeताज्या बातम्याशहरं

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शेवगावात जिल्ह्यातील कुस्तीपटू दाखल

शेवगाव : अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवा

ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पाच लाखाची लाच मागणारा एपीआय एसीबीच्या जाळ्यात
कर्जतमध्ये संत सद्गुरू गोदड महाराजांच्या यात्रेला सुरूवात
Displaying MIR_7850.JPG

शेवगाव : अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवार (दि.4 जून) पासून प्रारंभ झालेल्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कुस्तीपटू दाखल झाले आहेत. सकाळी कुस्तीपटूंचे वजन घेण्यात आले.
शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, संध्याकाळी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे व  जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे उत्तमपणे नियोजन करण्यात आले आहे. निमंत्रित कुस्त्यांबरोबर 42, 48, 52, 55, 60, 65, 74, 84 किलो आणि 84 ते 125 किलो ओपन गटात कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. कुस्त्यांसाठी दोन मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहे.

COMMENTS