Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिद्द आणि कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग ः तुपसुंदर

कोपरगाव - कोणत्याही कार्यात यश संपादन करायचे असेल तर जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा खरा मार्ग आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ  

मुलीला बोलल्याच्या रागातून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला
16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या l पहा LokNews24
टाकळी कडेवळीत सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन वाळुंज

कोपरगाव – कोणत्याही कार्यात यश संपादन करायचे असेल तर जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा खरा मार्ग आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते दिलीप तुपसुंदर यांनी व्यक्त केले. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गौरी पगारे ही सारेगमप लिटिल चॅम्पियन झाल्या बद्दल सकल मातंग समाजाच्या वतीने तिचा नागरी सत्कार करण्यात आला.
कोपरगाव येथील अण्णा भाऊ साठे स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात अँड. नितीन पोळ म्हणाले की राष्ट्रपती पदक प्राप्त विठाबाई नारायणगावकर, विठ्ठल उमाप, चंदन कांबळे, शीतल साठे, राधा खुडे, कोमल पाटोळे अशा गायनाच्या परंपरेत गौरी पगारे हिच्या रूपाने अजून एक नाव जोडले असून आपल्या गाण्यातून चळवळ मजबूत करावी. या वेळी बोलताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल म्हणाले की गौरी हिची वाटचाल प्रेरणादायी असून तिने गाण्याबरोबर शिक्षनाकडे दुर्लक्ष करू नये, कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन साबळे, व सोमनाथ म्हस्के यांनी केले. यावेळी विनोद राक्षे यांची व डी.आर काले यांची भाजप तर कृष्णा आढाव पाटील यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी प्राध्यापिका भिसे, जितेंद्र रणसुर, शरद खरात, रियाज शेख, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अर्जुन मरसाळे, अशोक पवार, प्रवीण शेलार, बाळू पवार, सुखदेव जाधव शफिक सय्यद, राजेंद्र खैरनार, अनिल मरसाळे अशोक म्हस्के, अनिल पगारे, रवी शेलार, सुजल चंदनशिव, किरण अढागळे, अशोक पगारे, सुरेश मरसाळे, फकिरा चंदनशिव, उल्हारे, खरात सर शंकर बिर्‍हाडे, निसार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS