Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा

सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात सुरु : ना. शंभूराज देसाई
कराड येथील महिलेच्या खूनाचा उलगडा
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिल्लीतील राज्य शासनाचे सीनियर कौन्सिल अ‍ॅड. वैजनाथन, अ‍ॅड. त्रिवेदी, राज्य शासनाचे वकील शिवाजी जाधव आणि इतर सर्व सीनियर कौन्सिल यांच्याबरोबर दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक झाली, असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ना. देसाई म्हणाले, बैठकीमध्ये न्यायालयीन व कायदेशीर बाबी आहेत. त्या राज्याच्या बाजूने कशा पध्दतीने अतिशय प्रभावीपणे मांडायच्या त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. याविषयी सिनियर कौन्सिल अ‍ॅड. वैजनाथ यांना मी आणि आ. चंद्रकांत पाटील यांनी सर्व सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी न्यायालयीन बाबी अतिशय प्रखरपणाने व प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत. याबाबत लागणारी सर्व अधिकची माहिती राज्य शासनाकडून तातडीने दिल्लीतील वरिष्ठ वकीलांना पूरविण्यात येणार आहेत. कोणताही छोटासा मुद्दा देखील राहू नये याची खबरदारी घेण्याच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. तसेच या प्रश्‍नावरील तांत्रिक बाबींची चर्चा करुन राज्याच्या बाजूचे सर्व मुद्दे कायदेशीर आधारासह सुस्पष्टपणे मांडण्याविषयी चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीवेळी राज्य शासनाची बाजू अतिशय काळजीपूर्वक तसेच प्रभावीपणे मांडण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावांना भेट देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आमचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्याचवेळी आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध कृतीतून करणार आहेत. त्याचवेळी डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचीही आठवण करून देणार असल्याचे सांगून बोम्मई यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

COMMENTS