Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  

भालगाव ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथील देवगड भक्त परीवारातील रामेश्‍वर तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 1जून 2024रोजी शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्ध

श्री साईबाबांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना
राहुरीत दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
बाळासाहेबांच्या शिवसेनेला खंबीर सेनापती मिळाले – देवेंद्र लांबे

भालगाव ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथील देवगड भक्त परीवारातील रामेश्‍वर तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 1जून 2024रोजी शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्ध, निराधार, अबाल अनाथ, अपंग आजी आजोबां समवेत वाढदिवस साजरा करून वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी निखिल शिंगी यांनी शरणपूर वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी हायमॅक्स महिन्याभरात बसविण्याचे आश्‍वासन दिले. तर संतोष औस्तवाल यांनी वृध्दाश्रमातील वृध्दाची सेवा हि ईश्‍वर सेवा असून आपण सर्वानीच या सामाजिक कार्यास हातभार लावाल हिच अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी रामेश्‍वर तनपुरे यांनी मी माझे भाग्य समजतो की या कार्यात मला सेवा करण्यासाठी आज पाचारण करण्यात आले. यावेळेस आसाम(गोहाटी)येथील महिला काल रात्री 10वा शरणपूर वृद्धाश्रमात आली. त्या महिलेची आस्थेने चोकशी करून तीला धिर देत नेवासा पोलीस स्टेशन येथील कर्तव्य दक्ष अधिकारी मा जाधव, (पी.आय)यांनी त्या महिलेची घरापर्यंत पोहच करण्याची जबाबदारी घेतली असून शरणपूर वृद्धाश्रमास सर्वच स्तरातील दानशूर दाते सहकार्य करत असल्याने यांचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी वृध्दाश्रमाची माहिती देताना काढले. तर अतिशय भावनिक होऊन आसाममधील महिलेला घरापर्यंत सोडविण्यासाठी भालगाव ता नेवासा येथील कर्तव्य दक्ष तरूणानी हातभार लावण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी भालगाव व पचकोशीतील निलेश तनपुरे, आम्ही नेवासकर न्युजचे सह संपादक अभिषेक गाडेकर, मुकेश तनपुरे, अशोक तनपुरे, किरण तनपुरे, किशोर तनपुरे, राजेंद्र ईरवाड, सुरेश शिंदे, निखिल शिंगी, संतोष ओस्तवाल उपस्थित होते. सर्व मानवराचे स्वागत संस्थेच्या सचिव सुरेखा मगर, व्यवस्थापक संतोष मगर, यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी केले.

COMMENTS