अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त आयोजित (आरोग्यवारी 2025) स्पर्धेत येथील राजेंद्र ऊर्फ हरिभाऊ
अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त आयोजित (आरोग्यवारी 2025) स्पर्धेत येथील राजेंद्र ऊर्फ हरिभाऊ घोडके यांनी 100 किलोमीटर धावण्याचा स्पर्धा पूर्ण करीत जिल्ह्यात पहिल्यांदा हा बहुमान मिळविला.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर पुणे ते बारामती असा 100 किलोमीटर अशा खुल्या गटात 85 स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेदरम्यान जेजुरी, मोरगाव, दिवे घाटातील चढ-उतार व कशाचीच पर्वा न करता राजेंद्र ऊर्फ हरिभाऊ सूर्यभान घोडके यांनी वरील स्पर्धा यशस्वीतेने पूर्ण केली. घोडके अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्कृष्ट धावपटू आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई टाटा मॅरेथॉन 42 कि.मी 2 वेळा, लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन 50 कि.मी. 2 वेळा, सातारा हिल मॅरेथॉन 21 कि.मी. 2 वेळा, तसेच खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन 56 कि.मी., गणपतीपुळे 56 किलोमीटर, कास अल्ट्रा मॅरेथॉन 65 कि.मी., बारामती पावर मॅरेथॉन 42 कि.मी., आपले पुणे 35 कि.मी व 42 कि.मी, अहिल्यानगर ते पंढरपूर रिले रन वारी 2025, अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी 2024, हिस्टॉरिकल मॅरेथॉन व नगर रायझिंग मॅरेथॉन 21 कि.मी. अशा विविध स्पर्धांत यश मिळविले आहे. घोडके रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. डायबिटीस असून देखील त्यांनी हे यश मिळवून डायबिटीस पेशंट व इतरांना प्रेरणादायी ठरत आहेत. तालुक्यातील घोसपुरी येथे ते वास्तव्यास आहेत. त्यांना हरिष काबरा, अनुपम संकलेचा, ललित लुणिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. आपल्या यशात कुटुंबीय, फिटनेस व मित्रपरिवाराचा वाटा असल्याचे ते म्हणाले. एआरसी फिटनेस, एएस फिटनेस, अहिल्यानगर रनर क्लब, रामकृष्ण हरी सुप्रभात समूह, मोहिनीनगर, केडगाव, पद्मावती रनिंग ग्रुप, कट्टा ग्रुप, गिगाबाईट कॉम्प्युटर परिवार, केडगाव, तसेच चिखली, घोसपुरी, केडगाव, अहिल्यानगर परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS