Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिंदू असूनही आम्ही अध्यात्मिक सत्तेपासून वंचित का ?

 हिंदू धर्म हा या देशातील बहुजनांच्या दृष्टीने आस्थेचा आणि पवित्र धर्म आहे. बारा वर्षांनी म्हणजे एक तपानंतर या धर्माचा कुंभमेळा होतो. तर, बारा कु

‘पेगासस’चे भूत
राज्यातील राजकीय नाट्य  
संसदेचे अधिवेशन पाण्यात

 हिंदू धर्म हा या देशातील बहुजनांच्या दृष्टीने आस्थेचा आणि पवित्र धर्म आहे. बारा वर्षांनी म्हणजे एक तपानंतर या धर्माचा कुंभमेळा होतो. तर, बारा कुंभमेळा नंतर एक महाकुंभ मेळा येतो; याविषयी आम्ही यापूर्वीच दखल मध्ये लिहिले आहे. परंतु, आज त्यावर पुन्हा लेखनी चालवण्याची गरज पडली आहे. या गरजेचे मुख्य कारण आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीला एका आखाड्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. ममता कुलकर्णी नावाच्या या अभिनेत्रीला न्यायालयीन कचाट्यातून नुकतीच सुटका मिळाली असली तरी, सामाजिक पातळीवर त्या निर्दोष मानल्या गेलेल्या नाहीत. चित्रपट सृष्टीत असतानाच त्यांच्यावर ड्रग्स तस्करी करण्याचा आरोप होता. त्यात अडकल्याने त्या तब्बल २५ वर्षे देशाबाहेर होत्या. तत्पूर्वी चित्रपट सृष्टीतील त्यांचे जीवन देखील ग्लॅमरसने भरलेले होते. ग्लॅमरस असणाऱ्या जीवनात अध्यात्माचा तर लवलेशही नसतो. नाही म्हणायला ग्लॅमरसने पिचलेले लोक काही वेळा अध्यात्माकडे वळतात; त्याचे मुख्य कारण मन:शांती असते. मात्र, मन:शांती करिता अध्यात्माच्या वाटेवर आलेले लोक अध्यात्मिक सत्तास्थानावर जात नाही. परंतु, ममता कुलकर्णी यांच्या बाबतीत मात्र, सगळ्याच बाबी अनपेक्षित झाल्या आहेत. एका खटल्यातून दिलासा मिळाल्याने त्या देशात प्रवेश कर्त्या झाल्या. त्या देशात दाखल झाल्या दिवसापासून त्यांचा अध्यात्माशी कोणताही संबंध असल्याचे दिसले नाही. परंतु, १४४ वर्षांनंतर म्हणजे, जवळपास आठ पिढ्यांच्या नंतर येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात त्यांना थेट अध्यात्मिक सत्तास्थानावर नेमले जाणे, या देशातील १२० कोटी हिंदूंवर अन्याय करण्यासारखे आहे. एक पिढी साधारणतः १८ वर्षाची मानली जाते. ज्याला, इंग्रजीत जनरेशन म्हटले जाते. पिढ्यानपिढ्या हिंदू धर्माशी आपली आस्था आणि पूजा स्थान असलेल्या समाजाला, यात स्थान मिळू नये, यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? हिंदू धर्म हा आमचा जीवन मरणाचा ही भाग आहे. तो आस्थेचाही भाग आहे. तो आमच्या पिढ्यानपिढ्या  संस्कारांचा ही भाग आहे. धर्माच्या मुख्य आध्यात्मिक सत्तास्थानावर आम्हाला नेमके कधी सामावून घेतलं जाईल? हा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंच्या समोर आजही आहे! अध्यात्मिक सत्ता क्षेत्रात सामावून घेतले जात नसल्यामुळे आजही हिंदू धर्म बांधव वेगवेगळ्या पंथांच्या मार्गाने आपली अध्यात्मिक भूक भागवत आहेत.  ही अध्यात्मिक भूक भागवण्याची पद्धती कितपत पर्यायी पंथांच्या माध्यमातून पूर्ण करावी लागेल, हा प्रश्न आजही आमच्या समोर आवासून उभा आहे. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरसमध्ये अखंड बुडालेल्या एखाद्या अभिनेत्रीला धर्माच्या अध्यात्मिक सत्ता क्षेत्रामध्ये सामावून घेतले जात असेल तर, आम्ही हिंदू धर्मीय म्हणून आमची अध्यात्मिक भूक भागवण्यासाठी अनेक पंथांशी जोडून आम्ही ते कार्य करीत आहोत. मग, आमची सक्षमता किंवा आमची पात्रता नेमकी कधी होईल किंवा ती कधी सिद्ध होईल, त्याचे काय निकष असतील, हे देखील आम्हाला आता धर्म सत्तेतील अध्यात्मिक सत्ताधाऱ्यनी निश्चितपणे सांगावं! मार्गदर्शन करावे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही निश्चितपणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्यामध्ये काय उणीवा असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. परंतु, आता, सामाजिक राजकीय सत्तेपेक्षाही आम्हाला धर्मातील अध्यात्मिक क्षेत्राची अधिक ओढ लागली आहे. परंतु, या धर्माच्या क्षेत्रामध्ये अध्यात्माची सत्ता देखील आमच्यापर्यंत पोहोचायला हवी, ही आमची खरी मागणी आहे.

COMMENTS