Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपकार्यकारी अभियंता मधुकर थोरात यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील मुळ रहिवासी व सध्या लातूर येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता मधुकर थोरात हे बुधवारी

केंद्र सरकारने तरी महाराष्ट्राला किती मदत करायची..? पंकजा मुंडेंचा सवाल
शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.
धक्कादायक… स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागला ताडपत्रीचा आधार…

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील मुळ रहिवासी व सध्या लातूर येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता मधुकर थोरात हे बुधवारी (दि.31) सेवानिवृत्त झाले. यानिमित्त अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत येथे त्यांचा सत्कार झाला.
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबासाखरचे माजी अध्यक्ष रमेशराव आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रताप आपेट, माजलगाव येथील माजी सभापती नितीन नाईकनवरे, निवृत्त कार्यकारी अभियंता पी. जी. जाधव व बी.एस. मुसांडे,निवृत्त अधिक्षक अभियंता सुदर्शन कालिके व श्री. सोमवंशी, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी अर्जुनराव थोरात हे होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते मधुकर थोरात व त्यांची पत्नी शुभांगी यांचा सत्कार करण्यात झाला. यावेळी उपस्थितांनी श्री. थोरात यांच्या समवेत आलेले अनुभव व आठवणी सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.  आपण शासकीय सेवेतून निवृत्त होत असलो तरी भावी काळात सामाजीक उपक्रमात सहभागी होण्याचा मनोदय श्री. थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी उपक्रम राबविणार्‍या आधार माणुसकीच्या उपक्रमास देणगी दिली. तर श्री. थोरात यांच्या मुलांनी आपल्या वडिलांसाठी चारचाकी गाडी भेट दिली.यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर,  लातूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, उपअभियंता नाना जोशी, श्री. पडवळ, व्ही.आर. बडे, श्री. बोडके, अभियंता संघटनेचे अध्यक्ष संगप्पा कपाळे, श्री. आळंगे, श्री. कलशेट्टी, गंगामाई शुगरचे अध्यक्ष हनुमंतराव मोरे, संचालक अविनाश लक्ष्मणराव मोरे, निवृत्त कृषी अधीक्षक श्री. मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी किशोरी मुंडे, माणिकराव बावणे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी श्री. थोरात यांच्या कुटूंबातील त्यांचे बंधू सर्वश्री भास्कर, सुधाकर, प्रभाकर विठ्ठलराव थोरात, मुले मयुर, सुमीत व डॉ. रोहित मधुकर थोरात यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन अ‍ॅड. संतोष पवार यांनी केले. डॉ. रोहित थोरात यांनी आभार मानले.

COMMENTS