Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री पवारांची गुंड आसिफ दाढीने घेतली भेट

पुणे ः पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इकबाल शेख उर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो स

माहीमच्या समुद्रातील वादग्रस्त बांधकाम हटवले
एससीईआरटी  तर्फे ७६१ शाळेत आभासी अध्यापन: दहावीकरिता सुटीतही वर्ग ऑनलाईन सुविधा 
आझम पानसरे यांची शरद पवारांना साथ

पुणे ः पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इकबाल शेख उर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. असिफ दाढी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून, पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्रांसह अटकही केली होती. अजित पवारांची त्याने भेट का घेतली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाही, तोपर्यंत आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे.असिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता. तृतिय पंथियांसाठी काम करणार्‍या एका संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे. आसिफ शेख उर्फ दाढीवर पहिला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. 1988 साली त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला. या घटनेतून त्याने गुंडगिरीमध्ये पदार्पण केले. मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्‍वात पहिले पाऊल टाकले होते. त्याच्यावर 2021 पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले. यामध्ये 1988 मध्ये मारहाण करणे, 1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, 2007 मध्ये अपहरण करून हत्या करणे, 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचणे, 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे,  अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. 2011 साली पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर त्या भेटीला अजित पवारांनी चुकीचं म्हटलं होतं. मात्र आता पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ दाढीसोबतचा अजितदादांचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे राजकारणात गुन्हेगारांचा समावेश करण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेतेच पाठबळ देत असल्याची टीका विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.

COMMENTS