उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत 

नागपूर प्रतिनिधी - देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे नेते असताना विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता. आज सत्तेत बसल्यावर त्या

  उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे अश्रू  
केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही
कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.

नागपूर प्रतिनिधी – देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे नेते असताना विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराचे प्रकरण जे विरोधी पक्ष  काढत आहे. ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे. एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नागपूरला आलो आहे .आम्ही म्हणालो काही बॉम्ब फोडू.काल उद्धव ठाकरे यांनी  सांगितलं की, वाती तयार आहे.अजून अधिवेशन संपलं नाही. सीमा प्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. ज्याप्रकारे ठराव तयार केला तो अतिशय भुलसट आहे.त्या ठरावात  संपूर्ण प्रदेश केंद्र शासित करावा याचा उल्लेख नाही. अब्दुल सत्तार आरोप, NIT भूखंड हा काय लवंगी फटाके आहे. विधानसभा अध्यक्ष विरोधीपक्षाचा आवाज दाबत आहे.ते व्हेलमध्ये  येऊन भाजप घोषणा देणे राहिले.अशा परिस्थितीतीत अणूबॉम्ब  फोडून फायदा नाही.

संपूर्ण सरकार अडचणीत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे.  भ्रष्टाचाराला  पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस मनापासून करत असतील असे मला वाटत नाही.त्यांच्या काही मजबुरी असेल.त्यांच्यावर लादलेल सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हाला संपूर्ण प्रदेश केंद्रशासितस करून हवा आहे.(सीमा भाग) महाराष्ट्र सरकारची नामर्दाची भूमिका आहे. बुलचट ठराव आहे.बोटचेपी भूमिका का घेता. शिवसेनेची भूमिका योग्य आहे. काही अडचणी होणार नाही.आधी त्यांची सुटका करा. सीमा प्रश्नाबाबत आम्ही सगळे एक आहोत.काल उद्धव ठाकरे यांनी सीमा बाबत जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका राहील.

COMMENTS