Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

शिक्रापूर / प्रतिनिधी : सध्या निवडणूकीचे दिवस असुन देखील राज्य सरकारने शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून

माळशिरस रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेत दोन तरूणांचा जागीच मृत्यू
पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री

शिक्रापूर / प्रतिनिधी : सध्या निवडणूकीचे दिवस असुन देखील राज्य सरकारने शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लवकरच जिल्हा परिषदेच्या आचार संहिता लवकरच असणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथे 208 वा शौर्यदिन निमित्ताने विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी रिपब्लीकन पार्टिचे अध्यक्ष सचिन खरात, बाटीर्चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटिल यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यातील 13 कोटी जनतेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी आलो आहे. याठिकाणी येणार्‍या अनुयायांसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या वतीने चांगली व्यवस्था करण्यात आली. निवडणूकीचे दिवस असुनही राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचार संहिता आहे.
यावेळी आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी बोलताना सांगितले की, अजित पवार यांच्याशी कोरेगाव भीमा परिसराच्या विकासाबाबात चर्चा झाली आहे.

COMMENTS