उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे. पवार यांनी म्हटले आहे की, काल मी कोरो

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न राबवा : पालकमंत्री शंभूराज देसाई
’आप’ च्या शैली ओबेरॉय दिल्लीच्या नव्या महापौर
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे. पवार यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोना झाला होता. आता त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटिजेन पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.

COMMENTS